Translate

24 April 2014

.मागू नकोस.मागू नकोस...
आताच माझ्या कविता....
अजून भिनलेल्या आहेत
त्या माझ्यात खोल..

पेशे-पेशीला लगडलेल्या आहेत...
तोडू म्हणता...
तुटणार नाहीत त्या आताच...

देईनच तुला...
जेव्हा अलगद सुटून येतील
ओच्यात माझ्या...

पापण्यांवर तरारतील मग...
तेव्हाच अलगद टिपून घे
.
ओठांनी तुझ्या...

...चैताली.

2 comments:

Sandesh Kesarkar said...

nice

Asha Joglekar said...

खूप दिवसांनी आले इथे चैताली, एक एक कविता वाचतेय रसरसून।

पापण्यां वर तरारलेली कविता ओठांनी टिपावी त्यानं अलगद
अन त्या कवितेचे रोमांच फुलावे त्याच्या अंगभर।