Translate

30 May 2011

फूलांच्या गावात...!!

फूलांच्या गावात...
पाकळ्या-पाकळ्या...
पानांच्या गल्लीत...
हरखती कळ्या...

फूलांच्या गावात...
वाराही अत्तर...
स्वप्नाळू प्रश्नांना...
सुगंधी उत्तर...

फूलांच्या गावात...
रुसावे न कोणी...
हळूच हसावे...
पाणेरी डोळ्यांनी...

फूलांच्या गावात...
पायांनी न यावं...
वाटांनी नूसत्या...
हृदयानं चालावं...

फूलांच्या गावात....
येता (अ) मानुष....
फूलांच्या ठश्यांनी...
होईल फूलांची...

.....फसवणूक....!


        ---चैताली.

6 comments:

aambat-god said...

khup sundar

इंद्रधनू said...

वाह...

Mrs. Asha Joglekar said...

Phulanchya gawat nasatat ka kate
ka nusatech shabdana futatat fate

he aapal ugeech aawadl tuz fulanch gaw.

BinaryBandya™ said...

फूलांच्या गावात...
पायांनी न यावं...
वाटांनी नूसत्या...
हृदयानं चालावं..

फारच छान कविता

परिचित... said...

चैताली...अहो तुमच्या ब्लॉग वरून मी हे 'माझा कवितेचा गाव' हे गाणं डाउनलोड केलं...अगदी झकास आहे...मस्त...!!!!

Swapnil Demapure said...

वाह... फारच छान कविता आहे...मस्त...!!
फूलांच्या गावात...

अगदी झकास