Translate

18 October 2013

गिरक्याभिर भिर गिरक्या घेऊन...
अलगदलेलं आल्हाद शरीर...
ती काळ्या कातळावर
आकाशाखाली आंथरते...

तेव्हा काही उरत नाही...
स्थळ काळ आयाम मिती...
ना कसली क्षिती...

सारं काही गौण...

आणि बस्स...
अचल..अपलक ती...!!

...चैताली.