Translate

31 May 2011

"खोल थंडाळल्या आकाशाखाली...."

डोरिस लेसिंग ही २००७ सालच्या नोबेल प्राईजची विजेती कवयित्री.
ह्या कवयित्रीने दोन कविता तेच शब्द वापरून (फक्त क्रम बदलला शब्दांचा)  लिहिल्या आहेत... त्यावेळी मी त्या दोन कवितांचा भावानुवाद केला होता.... बघा आवडतात की नाही...??
आणि हो मला अगदी खर्रया-खुर्ऱ्या प्रतिक्रिया द्या...नुसते वाह..छान नको...
हा एक प्रयत्न आहे स्वैर अनुवादाचा...
2.Cold low in the sky,

Dual language dwarf shrubs, grasses,

We smoke in the fire in a farming died.

Your memory endless vitality vitality, sorrow grief.

You shuttle in a crowded room,
A stranger, too familiar,

Body to just half, and you have to leave.

No loss of time, but the sound of the group

Weaving and cunning traps, trees.

, Oh, suddenly the flash cordial ghosts,

, You Yinghui the time in my sober,

Bushy touch with the absent-minded voice.

I sleep through the use of the hands and you know the tongue,
When he woke up found the dark so strong,

Infiltrated leaves bitter.  

हा दुसरया कवितेचा भावानुवाद....
ह्य कवितेत शब्द तेच आहेत पहिल्या कवितेतले.. फक्त क्रम वेगळा आहे शब्दांचा...
आणि अर्थच बदलतो साऱ्या कवितेचा...मी थरारून गेले अक्षरश: हे लिहिताना...


"खोल थंडाळल्या आकाशाखाली...."


खोल थंडाळल्या आकाशाखाली...
हि गवतझुडूपं...दुसऱ्या जगाची भाषा बोलत आहेत...
बघितलं असेल त्यांनी...
आपलं मरताना धुमसणं...किंवा धुमसून मरणं.....!!!

ह्या कल्लोळ-वस्तीतलं तुझं जाणं-येणं...
त्या चिरपरिचीत.... त्रयस्थासारखं....
विरहशृंखला घेवून येतात....जिवनासक्त....!!!


जावंच लागेल तुला ...माझ्यात अर्धवट घुटमळणाऱ्या राजसा...
मुळीच वेळ दवडू नकोस आता...
ह्या कुटध्वनी रचणाऱ्या वेळूच्या बनात...!!!

माझ्या मनगाभाऱ्यातली उबदार भासणारी भुतावळ...
तुझ्या आणि माझ्या विरू पाहाणाऱ्या आवाजाला
अजुनच फिक्कुटसा आभास देतात...पुसट करून मला.....!!!

मी अजुनही तुझ्या ऒजळीत स्व्पप्नाळते....
तरी तुला माहीत असणारी ती लपलपणारी रात्रजीभ...
अंधारपानांची चळत मांडते.... चढती...
उतरण नसलेली...!!!

----चैताली.


"क्षितिजाच्या रेषा गोठलेल्या असताना..."

डोरिस लेसिंग ही २००७ सालच्या नोबेल प्राईजची विजेती कवयित्री.
ह्या कवयित्रीने दोन कविता तेच शब्द वापरून (फक्त क्रम बदलला शब्दांचा)  लिहिल्या आहेत.. त्यावेळी मी त्या दोन कवितांचा भावानुवाद केला होता.... बघा आवडतात की नाही...??
आणि हो मला अगदी खर्रया-खुर्ऱ्या प्रतिक्रिया द्या...नुसते वाह..छान नको...
हा एक प्रयत्न आहे स्वैर अनुवादाचा...
1. "Under a low cold sky"

Under a low cold sky,

Small talking bushes, grass,

We died together in a fume of leaves.

Your memory nags and grieves.

In crowded rooms you pass,
 
A stranger, too well known,

Half turn, then you are gone.

Time does not slip, but weaves

Sly snares in voices, trees.


Oh intimate, elusive ghost,

You haunt my waking hours

With leaf-haired touch and half-hearted voice.


Through sleep I know your hands, your tongue.

I wake to find the darkness strong

With an acrid sense of leaves. 

"क्षितिजाच्या रेषा गोठलेल्या असताना..."

दुरदूरपर्यंत क्षितिजाच्या रेषा गोठलेल्या असताना...
कुजबुजत्या झाडांमध्ये...... धगधगत्या पानांमध्ये.....
अवगुंठून निजलो होतो....दोघे मर्त्य होऊन...तु आणि मी.....


चेहेऱ्यांच्या...गजबजत्या गावातून....वळून पाहाणारा तु...
देवून गेलास..टचकन्‌ पाणी..तुझी आठवण...रसरसती...
ओळख असलेला..... तरीही चेहरा अनोळखी...

तुझ्या पानगळीचा स्पर्श...आणि अस्फुट-अस्पष्टशी हाक..
जागते मी घेवून तुझीच सावली..तुझीच छाया..ओझरती...
अन्‌ ती निसटती वेळ...तरूगीतांच्या घट्ट्‌ विणीत अडकलेली....

चुंबीते निजस्वप्नांत तुझे हात....तुझे ओठ...
हाती उरते फक्त चर्रचर्र पानगळ...
आणि अंगावर येणारी रात एकटी अंधारी....

रात एकटी अंधारी....!!!
                
                           ----चैताली.

30 May 2011

फूलांच्या गावात...!!

फूलांच्या गावात...
पाकळ्या-पाकळ्या...
पानांच्या गल्लीत...
हरखती कळ्या...

फूलांच्या गावात...
वाराही अत्तर...
स्वप्नाळू प्रश्नांना...
सुगंधी उत्तर...

फूलांच्या गावात...
रुसावे न कोणी...
हळूच हसावे...
पाणेरी डोळ्यांनी...

फूलांच्या गावात...
पायांनी न यावं...
वाटांनी नूसत्या...
हृदयानं चालावं...

फूलांच्या गावात....
येता (अ) मानुष....
फूलांच्या ठश्यांनी...
होईल फूलांची...

.....फसवणूक....!


        ---चैताली.

14 May 2011

विझवून कातरवेळा...

आटोपून जगण्याची आन्हिकं...
अन्‌ विझवून कातरवेळा...
उभी ऊंबऱ्यावरी ओठंगून(मीरा??)....
मनात बासर,डोळ्यांत सूरांच्या झळा....!!
                         ----चैताली.