Translate

29 September 2011

चांदणधूळ

युगोनयूगे...
पिंपळाच्या पानावर...
अलगद सांजतारा ठेवून....
जाळीदार प्रकाश अंगावर लेऊन...
आकाशाशी  बोलणारी मी...

स्वत:च्या प्रकाशात मूरलेले (नूरलेले..??)सूर्य...
चांदण्यांच्या पूरात
वाहणाऱ्या चंद्राच्या सावल्या...
कित्येक रातींचा...
पिच्छा पुरवणारे धूमकेतु...
निळाईचा पसाभर वसा घेतलेले
अनाकार मेघ....

सारं सारं... अगदी जसंच्या तसं...

हे सगळं निरस्थपणे...
पाहणारं दुरस्थ आकाश  ...
अन्‌ ते माझ्याशीही बोलेल...
म्हणून...
चांदणधूळ जपणारी...
मंत्रस्थ मी...!


               ---चैताली.

20 September 2011

पाऊल खूणा...


डोंगर माथा...
मंदिर गाथा...
किती चालावे..???

पाऊल खूणा...
प्रकाशा विणा...
कसे शोधावे..??

आहेस आत...
असे खोलात...
किती शिरावे..??

प्रकाश रेषा..
धुसर अशा...
किती दिपावे..??

संपले सारे [!!]...
अशी मिटले...
[अन तू] पुन्हा दिसावे..??---चैताली.

07 September 2011

पावसाने पण किती
लावून धराव्या गोष्टी....
भिजलं तुझं शहर फक्त ....
पण माझी ...
वाहून गेली वस्ती...!!
          ---- चैताली.