बाहेर पडू पाहणारं काही..
आतंच राहतं...
फुलत राहतं आतल्या आत...
भिनत जातं खोल खोल..
सुगंध बनून नशा देत राहतं...
मग ती नशा...
गच्च चाफा बनते.....
तो जर्द चाफा..
गर्द फुलांनी
काही बोलेलसं
असं वाटत राहतं नुसतं...
हे काहीसं
तुझ्यासारखं होतंय का...
काही न बोलता
मनस्व असणाऱ्या
तुझ्यासारखं....!!
....चैताली.
2 comments:
असं होतं कधी कदी मन गच्च भरून राहातं पण मोकळं होता येत नाही.
छान कविता..
ब्लॉग आवडला
Post a Comment