Translate

17 February 2014

उसनी मातीपाय कच्चे आहेत माझे
तेव्हा घ्यावी लागते
उसनी माती वाटेकडून

मग विरघळतात पाय...
होतात तन्मय वाटचालीशी
निथळते
आकाश खांद्यांवरून...

चालताना हात पसरते..
कवेत घेते
अस्तित्वाचे परीघ
सप्तगात्रांनी बरळते
नसण्याच्या असंबद्ध कविता...
भ्रमांचे जाहीरनामे
लिहिते झाडांच्या पाना-पानांवर..

निरखते स्वतःला
लख्ख आसमानी आरशांमध्ये
आणि रचते तोडमोडून पुन्हा पुन्हा

मात्र पेशींची एकही मात्रा
जुळू देत नाही शरीराशी..

आणि तसेच अपरिपक्व ठेवते
अशब्द लागेबांधे
.....धमन्यांमध्ये

...चैताली.

16 February 2014

जाग्रत

किल्ल्यांच्या तटबंद्यांसारखं
व्हावं आपण
म्हणजे
खिंडारं सुद्धा
असोशीने सांभाळता येतील...
आश्वस्त शब्द काही
संन्यस्त पेट्यांमध्ये
करावेत बंद..

आणि

नद्यांचे माग काढत
अश्मयुगीन सांगाडा व्हावं...
अवस्त्र आत्म्याचे
पुरावे सुद्धा मागू नयेत

मग गोंदवावेत
काही जाग्रत ब्राह्ममुहूर्त
डोळ्यांवर
ज्यातून नित्य नवे जागर
निनादले होते...
    .....चैताली.

05 February 2014

Disdain
In the morning
When everything is
Unknown and strange for me
I don’t talk to myself
As
It’s just the poem which
I wrote yesterday

The poem still
Lingering on my face
Mingled in my eyes…
It says
Don’t disturb me..
With your lies…

I know
When it’s attachment
Is finished
It will go away

It will leave me
Disdained…
And
Only naive words
Will remain
Anyway.
   
     ….chaitali.