Translate

15 February 2010

नभनक्षी

कड्याशी...
हवा समुद्राळलेली...
सुर्याची...
ऊब आता डूबलेली...


किंचित....
ढग जरा रेललेला....
ओळीत...
पक्षी एक चुकलेला..


भरती....
सांजेला तूझ्या सयीची...
उरली...
नभनक्षी आठवांची...


सांभाळ.....
तुच वेड्या ह्या जीवाला...
आभाळ...
तुच माझ्या समुद्राला....!!--चैताली.