Translate

28 September 2012

नको लाऊन घेऊस...

नको लाऊन घेऊस...
दु:खं माझी जिव्हारी....
घेऊन फिरशील डोळ्यांत...
गच्च स्वप्नंलव्हाळी...

माझ्या अश्रूंना...

देवू नकोस थारा...
घेऊन फिरशील साथीला...
मग कोण रौद्र वारा...

माझ्या पापण्यांना...

देशी खांद्यावरी विसावा...
घेऊन फिरशील हृद्याशी...
.
.
मग अवकाश सारा....!

....चैताली.

3 comments:

श्रिया (मोनिका) said...

चैताली...तुझ्या काव्याला असेच उधाण येत राहो! तुझ्या बोलक्या कविता ह्या सुंदर ब्लॉगवर उतरत राहोत!
आजच्या दिवशी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा!

सूर्यकांत डोळसे,पाटोदा said...

छान

Abhijeet said...

क्या बात है!!