Translate

17 March 2013

हक्कझोप न येणाऱ्या कारणांची...
एक नीटस,सुबक वही करावी...
आणि अर्घ्य करावी स्वप्नांना...
किंवा असंच काहीसं उलट सुद्धा...

आणि जरा डोळ्यांवर...
टक्क पापण्या ओढून..
अध्याह्रुत रेषा...
सतर्कतेच्या भिंती...
बाजूला सारून बघावं...

तेव्हा
काही वाटतंच आहे..
असं वाटेपर्यंत...
आपण बरेच पुढे येतो..
असण्याचे डोंगर ओलांडून..

मग
अश्या वह्यांच्या थप्प्या चाळाव्यात...
तर दिसतात कुठे कुठे...
समरसतेच्या खूणा..
ज्यांच्यावर...
हक्कही सांगता येत नाही...!

...चैताली.

2 comments:

Vikas Deshmukh said...

ताई, तुमच्या कवितेचा ब्लॉग वाचला. कविता छान आहेत; पण माफ करा एक सांगतो. ब्लॉग डिजाइन मनाला अजिबात भावत नाही आणि तुम्ही कवितेतील प्रत्येक ओळीच्या शेवटी जे डॅश, डॅश, डॅश (....) दिले त्याचा नेकमा काय अर्थ? यामुळे वाचकाची लय तुटते. मुळात मराठीमध्ये अशा पद्धतीने डॅश, डॅश, डॅश देण्याचे कुठलेच चिन्ह नाही. व्याकरणाच्या विचार केला तर हे ‘...ङ्क चिन्हच चुकीचं आहे. त्यामुळे याचा वापर टाळावा. आपणच अशा पद्धतीने मराठीत चुकीचा पायंडा पाडणं योग्य नाही. तुम्हाला पटल नसेल तर सॉरी !

आशा जोगळेकर said...

झोप न येणाऱ्या कारणांची...
एक नीटस,सुबक वही करावी...
आणि अर्घ्य करावी स्वप्नांना...

अहा किति सुंदर .