Translate

17 November 2008

अस्सा हा चकवा...... कस्सा गं फसवा....
बाई... मी नाहीच भुलणार!

अस्सं हे जंजाळ......शब्दबंबाळ.....
अं....हं! मी नाहीच गुंतणार!

अश्शी ही रात........कस्सा गं घात......
नाही! मी नाहीच फुलणार!

अस्सा हा पाऊस........ कस्सा गं साहू?
च्चं! मी नाहीच भिजणार.....

अश्शी ही लाट........ कश्शी गं भरती......
....नाहीच सरणार!

अस्सा हा तकवा....... कस्सा गं गारवा.....
चल! नाही मोहरणार!

अस्सा गं बोलका.......... मनकवडा......
आत्ता कुठे जावू....... कश्शी गं लपणार!!!!------- चैताली.