Translate

20 September 2011

पाऊल खूणा...


डोंगर माथा...
मंदिर गाथा...
किती चालावे..???

पाऊल खूणा...
प्रकाशा विणा...
कसे शोधावे..??

आहेस आत...
असे खोलात...
किती शिरावे..??

प्रकाश रेषा..
धुसर अशा...
किती दिपावे..??

संपले सारे [!!]...
अशी मिटले...
[अन तू] पुन्हा दिसावे..??---चैताली.

1 comment:

Innocent Warrior said...

छान कविता!!!
आता काय छान वाटले असे आपल्या कविता आवडणार्‍यांनी सांगावे असे कुठल्याही कवि\कवियत्रीला वाटते.
पण मला या कवितेची लय आणि नाद आवडला. प्रत्येक ओळीतील अर्थ बरच सांगुन जातो.

कवितेबद्द्ल अभिनंदन.

-अभि