एक झाड पाण्याकाठी
खोल त्या पाण्यात पाही
उगाचच ते लवते...
पानी त्याच्या काही नाही....
एक घर पाण्याकाठी...
एकली खिडकी त्याची...
मोजी स्व:ताचेच वासे...
दारी त्याच्या काही नाही...
एक पक्षी पाण्याकाठी
पंख फक्त त्याच्या भाळी
उगा भरतो उडडाणे...
चोची त्याच्या काही नाही....
एक मुर्ती पाण्याकाठी...
पथिकाची वाट पाही...
आतूनच ती भंगते....
शेंदूर हा फिक्का होई..
एक वेडी पाण्याकाठी....
निश्चल बसते अशी...
स्व:ताशी ती बडबडे....
शब्द तीचे कोणी नाही....
--------चैताली.
1 comment:
या कवितेत शेवटचे जे शब्द आहेत ते खरोखर मनाला भेदनारे आहेत.....उत्तम निर्मिती आहे.
Post a Comment