Translate

24 November 2013

टोटल आउट...



आपलं ना.. 
सध्या सगळं total आउट. सायकलीच्या वाकड्या चाकासारखं...!!
म्हणजे हा आपला मलाचं आलेला doubt बरं का... आउट काढावाच लागतो म्हणतात.
त्यातल्या त्यात बाई आउट म्हटल्यावर जास्त काळजीचं काम (कि काळजाचं?)
चला इथे हा शब्दच्छल जमलाय म्हटल्यावर जरा तरी जागेवर असणार आपण! 


इथे तर आपण झोपेत सुद्धा झोपलेलो नसतो,तिथे पण वेगळ्याच उलथापालथी सुरु असतात..झोप न येण्याचा रोग असतो म्हणे.. पण मग आपण तर झोपतो व्यवस्थित पण तरी जागं आहोत हे कळत राहतं.
मग मेंदू जागा कि मन...? कि आणखीच आतलं दुसरं काहीतरी?
आणि झोपेत सुद्धा डोळ्यातून थेंब पाझरला हेही जाणवतं तर काय म्हणावं मग? 


मग काय मेंदूतल्या पेशी बिशी तर मरायची सुरुवात तर नाही न ही? की vitamins कमी आहेत.. चलो चेकिंग करो तर ते सगळं पण ओक्के एकदम...मग च्यायला आहे तरी काय हे..

ह्या आतल्या गोष्टी कोणाला सांगतच नसतो न पण आपण...
जास्त विचार करू नये..जास्त खोल जाऊ नये म्हणे..
कोणाला कळत नसतं आपल्या आत काय सुरू आहे ते..पण बहुतेक जाणवतंच वाटतं..
शेजारून जाणारा/जाणारी सुद्धा आपोआप एक क्षण स्तब्ध होऊन पाहतोय आपल्याकडे हे कळतं,
कोणी म्हणतं डोळे खूप वेगळे आहेत तुझे.. आपण सांगतो झोप झाली नाही नीट!


हम्म..तर आऊट काढावाच लागतो म्हणतात.
म्हणजे काय तर मग लोकांशी बोलावं लागणार.
करकच्चून नाती जपावी लागणार.वाट्टेल तेव्हा डोळे बंद करून चालणार नाहीच.
डोंगरावर जाऊन राहते म्हणायचं नाही.
तिथल्या हिरवळीवर लोळायचं मनात आणायचं नाही ..
येड्या अवघड कविता लिहायच्या नाहीत..
म्हणजेच जास्त “खोलात” जायचं नाही.

खोलात जायचं नाही म्हणजे काय नक्की??

इतका खोल जाऊन काय शोधतोय आपण तेच कळत नाही.

”जास्त खोलात जाणार्यांना थांग लागत नसतो” असं कोणीतरी ऐकवलं होतं एकदा..
तर त्यातही प्रश्न पडले पुन्हा म्हणजे नक्की काय?

“खोलात जाणार्यांना थांग “ कि “खोलात जाणार्यांचा थांग..?”
म्हणजे आपण नक्की कुठे? अध्यात..मध्यात.. तळात कि मध्यतळात?
“थांग थांग आय मीन सांग सांग...! हा झगडा आधी मिटव यार.. मग बोल आपल्याशी...”
थाड थाड डोकं आपटत गेला सांगणारा..
 

 म्हणजे पुन्हा तेच..आपण "टोटल आउट"


माझ्या मुलीच्या भाषेत “gone case”!!

                 ---चैताली.

2 comments:

Samir said...

नुसत्या आपल्या भवसागर पार करण्याच्या गप्पा मारत असतात लोकं. मी म्हणतो, "भवसागर पार केलाच नाही तरी काय बिघडणार आहे नक्की ?" ह्या प्रश्नाचं उत्तर सापडलं तर खोलात जाऊन काय शोधायचं ते कळेल...

विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी
परी लीहिता कोण त्याचे कपाळी ?
हरू जाळितो सर्व संहारकाळी
परी अंति त्या शंकरा कोण जाळी ?

अशा प्रश्नांची उत्तरं खोलात गेल्याशिवाय मिळत नाहीत असं विद्वान मंडळी म्हणतात… उगाच त्या विद्वानांच्या विरोधात कशाला जा ? काहीतरी शोधल्यासारखं केलं की झालं.

Saurabh said...

खरच.... "टोटल आउट"
छान...