Translate

10 November 2013

नंतर....मग ती..
त्याच कातळावर पहुडून..
आजमितीचं अस्तर अंगाभोवती लपेटून...
त्याला विचारते काही-बाही...
तर तो आकाश पांघरत..
काहीसं पुटपुटतो...

आणि पाय पोटाशी घेऊन...
तिच्या उबेत..
नि:शब्द पडून राहतो...

ती त्याला थोपटून..
मग निघते..
कातळावर फूलं फुलवायला...
(युगोन् युगे हेच तर करत आलीय ती...)

......चैताली.

No comments: