Translate

27 June 2011

हा पाऊसही तुझ्यासारखाच....

हा पाऊसही तुझ्यासारखाच....
अनोळखी....!
उन्हाच्या मागे बेताल ढगांसह....
धावून जाणारा...
छत्रीच्या कडाकडांवरून थबकून....
वाऱ्याला गुंगारा देवून.....
रस्त्यांना सुन्न करणारा...

हा पाऊसही तुझ्यासारखाच...
बेभरवश्याचा...!
येशील...येशील म्हणताना....
दूर गावी कोसळणारा....
एकटी असताना मात्र...
भर दुपारी गाठून....
अंगोपांगी झिरपणारा....

मीही पावसासारखीच....
वेडी-बावळी....!
काजळ-काळ्या डोळ्यांमध्ये...
पाऊस घेवून फिरणारी...
उन्हाची तिरीप पकडून...
माझ्यातच रमून हसणारी...!


           ----चैताली.

12 comments:

videsh said...

छान कविता .

BinaryBandya™ said...

काजळ-काळ्या डोळ्यांमध्ये...
पाऊस घेवून फिरणारी...

सुंदर

क्रांति said...

सुरेख!

Asha Joglekar said...

फारच छान .

PIN@LL said...

mastach!!

Milind said...
This comment has been removed by the author.
Milind said...

मस्त

सुप्रिया.... said...

चिंब झाल... :)

Anonymous said...

सुंदर कविता....

Unique Poet ! said...

छान कविता...!


एक सुचवतो.... ह्या टेम्प्लेटमध्ये कविता लिहीण्यासाठी वापरलेले काही रंग खूप गडद वाटतात.... लिहीलेले वाचायला थोडा त्रास होतो...... मधला ब्लॉगपोस्ट चा भाग प्लेन असेल असे टेम्प्लेट निवडलेत तर.... छान !

Abhi said...

खुप दमुन आल्यावर मस्त आंघोळ केल्यावर जसे ताजेतवाने वाटते ना, तसे वाटले कविता वाचुन...

श्रिया (मोनिका रेगे) said...

वाचून पावसाळले न मी! छान वाटले :)