Translate

08 July 2011

एक गाणं...पाऊस.. आणि ती...!

एक गाणं...
पावसामध्ये
सूर हरवून भिजलं...
पावसाच्या रेघांमध्ये...
लय शोधू लागलं...!

एक पाऊस...
रस्त्यावरती...
थेंब हरवून बसला...
तिच्या केसांमध्ये....
मोती होऊन फसला....!

एक ती...
त्याच्यासोबत...
मनसोक्त हसली...
त्याच्याच कुशीमध्ये ...
मंद-धूंद लाजली...!


      ----चैताली.

5 comments:

सुप्रिया.... said...

ताई तू म्हणजे....

एक तू....
ओली कविता..
शब्दात चिंब झालेली....
कवितेच्या तळ्यातले...
शब्दमोती वेचणारी.....

:)

BinaryBandya™ said...

एक पाऊस...
रस्त्यावरती...
थेंब हरवून बसला...
तिच्या केसांमध्ये....
मोती होऊन फसला....!

सहीच :)

हा पावसाळा तुमच्याकडून चांगल्या चांगल्या कविता वसूल करतोय ...
धन्यवाद त्या पावसाला आणि तुम्हालाही ..

Yogesh said...

i lile.....

Innocent Warrior said...

कविता वाजताना प्रत्येक कडवं डोळ्यापुढे सजिव झाले.
आणखी एक छान कविता.

Jitendra Indave said...

तिच्या केसांमध्ये....
मोती होऊन फसला....!


अप्रतिम