माहित नाही.....
सगळ्यांच्या बाबतीत असं घडतं कि नाही...
कि माझ्यातच दडलीये अशी गर्द वनराई.....
सळसळ ,थरथर,घालमेल,तडफड.....
अन् जीवाची न साहणारी परवड....
काधी-कधी तर ह्या ओढाळ मनाची दहशत...
स्वप्नांनाही बंदी घालते स्वप्नात येण्याची...
मग स्वत:वरच निलाजरी .....तोहमत...!!!
लक्ष द्यायचं नाही ठरवलं तरी कुचाळक्या करतंच मन...
ठोक्यावर ठोके... घणघण....
ना कोणाची साथ.....ना सावरणारा हात.....
फक्त मी अन् माझ्या अस्वस्थ विचारांची वरात.....!!!
खुळावून जायला होतं पण रडायला होत नाही....
पसारा उधळलेल्या आभाळाचा......कासरा सापडत नाही....
माझ्या मनाचा वारू आटोक्यात येत नाही....
अस्वस्थता अशी उतू जात असता.....
मन होतं रानभरी.....जीवही घाबरा.....
वाट चुकतात चांदण्या माझ्या......
आभाळ माझं परागंदा......!!!
------चैताली.
No comments:
Post a Comment