Translate

17 March 2009

थोडं उरावं.....!!

स्वत:लाच असुया वाटावी इतकं काही .....
हाती असताना...
एक करायचं..सारं काही लखलख...
चमकत असताना...
खोल नि:श्वास सोडून पळभर उभं रहायचं...
चमचमणाऱ्या ताऱ्यांना हातांनी दूर सारायचं...

तेव्हा त्या झगमगाटापासून दूर दिसतात... काही चेहरे...
आपली वाट पाहणारे......
आपण पुढे जावं म्हणूनच.....
आपला हात सोडलेले...

त्यांच्या डोळ्यातली चमक.....
हेच तर आपलं यश असावं...
पण ती चमक विझून जायच्या आत...
आपण दोन पावलं मागे फिरावं...
आकाश तर आहेच आपलं...
पण त्या आपल्यांसाठी....
कधी-कधी....
परत फिरावं...

थोडं उरावं.....!!----चैताली.

4 comments:

Innocent Warrior said...

kiti khara aahe he!!

आशा जोगळेकर said...

पण त्या आपल्यांसाठी....
कधी-कधी....
परत फिरावं...

सुंदर ग.

Atul said...

एकाकीपणा हा बहूतेक कवयित्रिंच्या कवितेचा विषय झाला आहे.. प्रत्येकीची अभिव्यक्ती वेगळी पण मूळ तेच असते. पण तुझ्या कविता मात्र अपवाद आहेत. त्यात खूप विषयांची आणि जाणिवांची खूप वरिएत्य आहे. मला वाटते.. तुला जाणीवा टिपायला आवडतात.. तेच एक मुख्य सुत्र सार्‍या कवितांमध्ये आहे.

Ketan Kulkarni said...

toooooo good ! Loved it. ( as usual )