Translate

23 March 2014

.बुद्ध.थकलेल्या शरीरानिशी...

निजाळलेल्या पावलांनी....

शोध सुरु राहतो

रात्रभर...तेव्हा

अस्वस्थतेचे पाढे

आणि न निजेचे स्तोत्र..

ह्यांचा मेळ घालत..मानलेल्या दु:खांचे

रकानेच्या रकाने

डोळ्यांवर रेखून...काही स्वप्नं

स्तब्ध बसतात उशाला

बुद्ध बनून...

  

 ...चैताली.


No comments: