Translate

24 July 2013

गाठ

तू म्हणालास...
"गाठ मारून ठेवली आहेस स्वत:ला..."
कोणी तरी माहित असलेलं सांगितल्यावर....
हसतो आपण... तशी हसले...

त्या गाठी अलीकडची मी....
पलीकडची मी...
अन मला विभागणारी गाठ...!

मारलेल्या गाठी दिसतात..
सुटलेल्या नाहीच...

गुंता होण्याऐवजी
गाठीला एखादी
गाठ असलेली बरी.. नाही का....!

....चैताली.

1 comment:

परिचित... said...

गुंता होण्याऐवजी
गाठीला एखादी
गाठ असलेली बरी.. नाही का....!

ह्या लहानश्या ओळींत फार मोठा बोध बोलून गेलीस...अगदी अप्रतिम...!!!!