Translate

02 March 2012

विंझोळ....

एका ढासळत्या क्षणी...
धास्तावल्या गात्रांनी..
चुकून आत्मा स्पर्शला..

त्राहि माम..त्राही माम..
म्हणत मग रंध्रांनी..
सळसळ प्रकाशरेषा...
त्वचेवर आंथरल्या..

अंधारभुक्त बुब्बुळं..
चुळबूळून उजळली..
हातांची बोटं फटफटली...

ठिय्या मांडून बसलेल्या...
ठळक आयुष्याच्या ओळी...
कपाळभर खुसफूसल्या...

अन मी क्षणभर का होईना..
सारे विंझोळ..
ओंजळीत घेऊन...
ओठभर हालले...!


    ....चैताली.

3 comments:

sanket said...

सुंदर कविता. आवडली..

माझ्या गात्रांतला शीण घालवायला आत्मा स्पर्शावा म्हणतोय मी ! :)

इंद्रधनू said...

वा क्या बात. तुमचं भाषेवरचं प्रभुत्व केवळ अप्रतिम....

आशा जोगळेकर said...

आत्मा स्पर्शणं काय अफाट कल्पना आहे . अप्रतिम रचना .