Translate

22 February 2012

अनुल्लेख....

कुठेच शिल्लक नसणे माझे..
असेच क्षुल्लक असणे माझे..
वाटांवरती चालताना...
सापडती भग्न...
अवशेष माझे...

असेच हकनाक रुसणे माझे...
असेच झाकोळ,विझणे माझे...
स्वत:शीही बोलताना...
श्ब्दांनी होणे
कफ़ल्लक माझे...

असे ’जरा’च दिसणे माझे...
असेच अस्फूट असणे माझे...
उरी फुटताना..
डोळ्यांनी होणे..
अपलक माझे...

असेच मुबलक नसणे माझे
असेच संदिग्ध संदर्भ माझे...
सापडतील फडताळांना...
फुटके तुटके..
अनुल्लेख माझे...!


   ....चैताली.

11 comments:

Vinayak Pandit said...

कविता आवडली चैत्राली! शुभेच्छा!

श्रिया (मोनिका) said...

कविता खूप छान चैताली ....
आशय खूप छान मांडला आहेस.सोप्या शब्दात पण बरच काही सांगते कविता...

Yashwant Palkar said...

उल्लेखनीय अशी "अनुल्लेख" कविता

चैताली आहेर. said...

abhaar... :)

BinaryBandya™ said...

chhan.

Ashwini Vaidya said...

kavita sunder!

sanket said...

खूप छान कविता... आवडली !

परिचित... said...
This comment has been removed by the author.
परिचित... said...

शब्द तेच असतात...पण जरा हळू हळू वाचलं कि आणखी खोल वर नेऊन सोडतात....अतिशय सुरेख कविता...अगदी आवडली...!!!
आणि चैताली.. सध्या भावनांचा चांगलाच जोरात खेळ चालू आहे तुझ्या मनात...!!! :)

प्रियंका जाधव said...

चैताली खुप सुंदर

प्रियंका जाधव said...

चैताली कृपया माझ्या फेसबुक Id वर माझी मैत्री स्वीकार कर