Translate

28 September 2010

......वाटतं....!!

वाटतं...
चालत जावं....
आकाशाच्या भिंती ओलांडून....
नसलेलं असलेपण पाठंगूळी मारून....

वाटतं....
विखरून जावं....
भोवतालचं भवंडलेपण...
उद्धृत वाटांच्या माथी मारून...

वाटतं...
कधी न कळावं....
नगण्य व्यवहारीपणाच्या...
शून्याचे घरंगळलेपण....

वाटतं....
कधी न कळावी...
वर्दळीची भाषा....
अन्‌ चढत जावी....

एकटेपणाची नशा.....!!


          ----चैताली.

5 comments:

श्रिया (मोनिका रेगे) said...

छान लिहिली आहेस कविता चैताली.. 'नसलेले असलेपण' सगळेच जण सोबत घेऊन हिंडत असतात.
बाप्पाने आपल्याला जेव्हां पृथ्वीवर पाठवले तेव्हां स्वतःला स्वतःबदल जे वाटते ते आणि दुसर्यांना आपल्याबद्दल वाटते ते अश्या २ ठळक' मी 'मध्ये प्रत्येकजण दुभंगला गेला......कोणाला नको होते हे असे अंतर्मनाला फसवणे.कारण मनातला खरेपणा आणि बाहेरच्या जगातला खोटेपणा,ह्यात नेहमीच झुंज होत राहिली आणि राहील.....
तुझ्या कवितेतले दुसरे कडवे वाचताना वाटले कि खरच अस विखरून जाता आले असते तर! नगण्य व्यवहाराला कधी थांबवता येणार नाही,कारण माणसा माणसातले दुवे दिवसेंदिवस सैल होताहेत, आणि मग वाटते किती खरे कि कधी न कळावी...
वर्दळीची भाषा....
अन्‌ चढत जावी....

एकटेपणाची नशा.....!!

चैताली आहेर. said...

<<<>>>>

श्रिया....किती सहजपणे कविता उलगडलीस गं...
मी असं का लिहिलं हे मलाही कळलं नव्हतं खरं तर...पण तू मला सांगितलंस... thanks dear...!

Raj Jadhav said...
This comment has been removed by the author.
Raj Jadhav said...

खूप छान मांडली आहे पूर्णच... पण "नसलेलं असलेपण" हे जबरदस्तच

आशा जोगळेकर said...

अन्‌ चढत जावी....

एकटेपणाची नशा.....!!
खरंय का हे ? कि ही एकटे पणाची नशा फक्त सभोवताली गोंगाट असला की च हवीशी वाटते पण खरंच जेंव्हा हे एकटे पण लाभतं तेंव्हा, तेंव्हां वाटतं खूप लहान मुलं यावीत त्यांनी भरपूर दंगा करावा घर विस्कटून टाकावं अन् त्याच बरोबर मला पण.