Translate

26 March 2009

.....नको दुभागणं.....!!

मी बंद केलं स्वत:च...
स्वत:ला मांडणं....
सोपं नव्हतंच कधी..
मनाला फेडणं....


आतापर्यंत काहीच...
बोलले मी नाही....
जमलंही नाही मला...
मुक्याने मागणं...


निस्तरणे शक्य नाही...
हे शाप-उ:शाप...
का जीवन-दोरीवर...
उगाच दोलनं...


किरमीजी दु:ख माझं...
डॊळ्यात राहीलं.......
दिसेना तेजपिसांची...
ती स्वप्नंउड्डाणं....


विकल गात्रांनी किती...
दु:ख उजवणं...
फरफट नको आता...
नको दुभागणं........नको दुभागणं.....!!----चैताली.

No comments: