Translate

09 March 2009

मन झिम्माड झिमाड.....

मन झिम्माड झिमाड..
असं अल्याड-पल्याड..
रंगवतं दाही दिशा.
असं झालंया उनाड...

मन भिल्लाचं पोर..
लावी जीवाला गं घोर...
धुंडाळतं दाही-दिशा...
अश्या खोड्या शिरजोर....

मन वेल नाजूकशी..
सुखी पानांची नक्काशी...
दुखावतं फूलांमध्ये..
होता पानगळ अशी...

मन बिल्लोरी आईना...
त्यात जगणं माईना...
पालवते साऱ्या आशा......
नवं स्वप्न चेहेऱ्यांना..

मन निघता प्रवासा...
जणू चोर-कवडसा...
प्रकाशून दाही दिशा...
होत जाई पुसटसा...

मन किनखापी रात...
चांदण्यांची गलबतं....
चमचम त्यांची भाषा...
वाऱ्यावर खलबतं...

मन रांगडा साजण....
असं प्रेमाला उधाण...
सुखावतो अंगोपांगी...
माझं खोटंच गाऱ्हाणं...---चैताली .

4 comments:

Innocent Warrior said...

चैताली, काय साही लिहिले आहे!!!

मस्तच!!!

फारच उत्स्फूर्त आहेत सर्व कडवी.

मजा आली!!!

धन्यवाद,
अभी

आशा जोगळेकर said...

चैताली खरंच खूपच छान जमलाय मनाचा अन कवितेचा सूर.

Atul said...

तुझ्या कविता खूप स्वप्नाळू आहेत ग.. एका कवयित्रीचे मन परी होऊन उडत आहे आणि तिला ह्या अथांगात जे जे दिस्ते आहे.. ते तुझ्या कवितेत आहे!

Suman said...

kavita gaat gungunave vat te chhan ahe.