प्रत्येकवेळी असंच होतं......
नादभरल्या डोळ्यांनी काही सांगायला जावं.....
अन् तु शब्दांची किंतानं ओढून बसावं.....
मी उभं रहावं स्तब्ध झाडाप्रमाणं........
आणि तु मूळा-मूळांनी माझ्यात पसरावं....
मी फांद्या मागाव्या उसन्या...
तु नुसतं पानात हसावं...
मी श्वासांच्या कंपनतारांवर वाळत घालावं जगणं....
त्याचवेळी तूझं आयुष्याला बोलावणं....
असंच का होतं....सारखं-सारखं....
भिंगारला जीव श्रांत करून मी बसावं.....
अन् तु आणावी परत स्वप्नांची लव्हाळं.....
बोलले नाही ओठांनी शहाण्या...
समजून घे ना....
उपशमल्या जीवाच्या....
अश्रांत कहाण्या....!!!
------चैताली.
2 comments:
nice
कसल सही लिहल आहे झकास.... :)
मी उभं रहावं स्तब्ध झाडाप्रमाणं........
आणि तु मूळा-मूळांनी माझ्यात पसरावं....
मी फांद्या मागाव्या उसन्या...
तु नुसतं पानात हसावं...
मी श्वासांच्या कंपनतारांवर वाळत घालावं जगणं....
त्याचवेळी तूझं आयुष्याला बोलावणं....
खुपच आवडल मला....
m gtng crazy abt ur poems day by day....
Post a Comment