Translate

26 September 2008

"गप्प-गप्प का......"

बरं झालं.......
माझ्या आभाळाला गेलेला तडा तूला दिसलाच नाही ते......
पण बघ.....सावर मला आधीच....
सोपं नाहि रे....नभांच्या तुटक्या रेषांवरून चालणं......
चांदण्या बोचतात....
आकाशाचे कोपरेे रूुततात.....
अश्या वेळी क्षितिजंही साथीला नसतात....
इंद्रधनुष्य तरी किती दिवस तोलणार आकाश....

म्हणून म्हणाले....बरं झालं....
माझ्या आभाळाला गेलेला तडा तु बघितलाच नाही ते....
नाहीतर म्हणशील मग.....
"गप्प-गप्प का......
एवढं काय आकाश कोसळलंय........!!"------चैताली.

2 comments:

G@uri said...

"गप्प-गप्प का......
एवढं काय आकाश कोसळलंय........!!"

काहीच शब्द सुचत नाहीये यापुढे...

Pinall said...

माझा कडे काहीच नाही आहे ह्यासाठी सांगायला..... एवढंच की hands of u.....