Translate

09 August 2008

मोजदाद .................!!!

मोजदाद .................!!!

आजकाल आठवणींना नाही जास्त छेडत ..
कारण मग त्या तुझ्याशिवाय दुसरं नाहीच बोलत..
तुझ्याशी बोलताना राहाणं तटस्थ...
अवघड आहे मनातली वादळं..आंदोलनं अशी लपवणं...
कविता तरी सुचावी ना मग छानशी...
तर तीही येते रडत-खडत...
तुझंच नाव पांघरत...
आणि फक्त विचार उरतात..
"आपली भेट" स्वप्न तर नाही ना..असं कूजबुजतात..
किती दिवस झालेत..डोळ्यांत बघितलंय का माझ्या..खोल..
ऐकलेस का मी न बोललेले बोल...
तुच म्हणाला होतास ...
नजर लागते विश्वासाच्या नात्याला... जगाची......
तसंच काहीसं झालंय का...
कारण आजकाल तुही हातचं राखून बोलतोस....
शब्द न शब्द तोलतोस...
मलाही इतरांत मोजतोस....??
अशी मोजदाद करु नये शब्दांची अन....
माणसांचीही...!!


---चैताली.

5 comments:

Meghana Kelkar said...

मोजदाद शब्दांची आणि माणसांची, तोलून मापून हातचं राखून केलेली..तीही आपल्याच माणसांनी!! लाजवाब!

तुझा गंध वेचताना मीही बकुळ झाले - सोनाली said...

aflatun chaitali!!!

Shivaji Jagtap said...

...
कारण आजकाल तुही हातचं राखून बोलतोस....
शब्द न शब्द तोलतोस...
मलाही इतरांत मोजतोस....??

APRATIM JAMOON AALET SHABD...

Shivaji

Pinall said...

मस्तच....

Ketan Kulkarni said...

"kiti divas zalet... dolyat baghitlay ka mazya... khol.."
speechless !! you r awesome indeed !!