Translate

09 August 2008

तूझ्या माझ्या गं घरात...

आई.....

तूझ्या माझ्या गं घरात...
त्या आपल्या अंगणात...
फुलं प्राजक्ताची सारी...
मी गं दंग वेचण्यात ...


साद घातलीस मला...
गोड तूझ्या आवाजात...
आले धावत-पळत...
उधळे रांगोळी रंग....


परत घाल ना आई
तशीच साद गं आज..
आंगणी बहरला का..
तो पारिजात परत...

तूझ्या डोळ्यातले दु:ख...
माझ्या पदरात घाल...
नको सांडूस आसू...
माझ्या नयनी तु हास...----चैताली.

3 comments:

HAREKRISHNAJI said...

सुरेख

Meghana Kelkar said...

तूझ्या डोळ्यातले दु:ख...
माझ्या पदरात घाल...
नको सांडूस आसू...
माझ्या नयनी तु हास...

waaah chait!

Meghana Kelkar said...

चैत,
ई-साखळी हायकू मधे तुल पुढ्चा खो देते आहे...माझा आणि आशा चा ब्लोग बघ म्हणजे नियम कळतील,


रस्त्यातल्या फुलांचा
धुंद गंध दरवळला
मुक्कम तिथेच हरवला!
(इति सुमेधा)
जुन्या शर्टाच्या खिशात सापडली
रस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं
माझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी
(इति चक्रपाणि)
कोमेजलेली फुलं
गंध तसाच कायम तरी
तुझ्या अथांग प्रेमापरी
(प्रशांत)

जुनं पुस्तक उघडतांच
पडला एक वाळका गुलाब
आता त्या सारखाच प्रेमांत उरला नाही आब (आशा)


छाती वरती डोकं टेकताना
तलम झब्बयाचा स्पर्श घेताना
माळलेला गुलाब काय तुलाच धुंद करत होता? वेडा! (मेघना)