सरळ रेषेत चालताना
सरळसोट डांबरी रस्त्यांना साजेशी
खूपशी शहरं लागली आपल्याला
परक्यासारखी एकमेकांची
शहरं निरखत राहिलो,
घालत राहिलो
चालण्याच्या शपथा
तरीही दोघांनी दिसली होती गावं
धूसर प्रतलं छेदणारी
धुक्याआड दडून डोळ्यांच्या कोपऱ्यात
नेहमी दिसत राहणारी
तळहातांवर लपेटून
घेतल्या असत्या शहरांच्या
अंजिरी कथा
तर रस्त्यांनी उलगडली असती
मनातली हिरवीकंच गावं
डोळ्यांच्या डोहांमध्ये...
-चैताली.
No comments:
Post a Comment