बेचैनीची झुंबरं...
डोक्यावर घेवून फिरताना....
भर दुपारी डोक्यात घुसलेला सूर्य...
मरणाची नशा देतो....
फर्र फर्र कानात घुसलेली हवा...
काळजाला चेतती ठेवते..
ही आतली झुंबरं....
तर जास्तच लख-लख...प्रशस्त...
वाटतं...
सगळ्यांमध्ये बसलेलं असताना...
प्रकाश भस्सकन डोळ्यांतून सांडतो की काय...
"लक्ष कुठेय तुझं..???"
कोणीतरी विचारतं...
सारां चित्तं एकटवून...
ओळखीचं हासते मी...
त्यांना साहवेल इतपतच...!
त्यांना काय माहित...
कुठे-कुठे फिरत असते मी..
कळस पायथे पालथे घालत...
धुकं फूंकत...रस्ते मिरवत..
मला नसते कसली शुद्ध....
ना कसली फ़िकिर...
.
आत असतो एक...
वेडा फकिर....
वेडा फकिर....!!
.....चैताली.