Translate

25 July 2011

एवढं कराल का....???


   सकाळी दहा-अकरा वाजता दाराची बेल वाजली.... "आता कोण..?" पोराला काखेत मारून दार उघडलं... बघते तर समोर दोन पोलिस,बहुरुपी आहेत हे तर मी लगेच ओळखलं... पण तो मात्र लगेच.."घाबरू नका ताई..!" गालातल्या गालात हासत मी त्याला पन्नास रुपये दिले...वहीत नाव लिहिलं...
       मान वर केली तर शेजारीण माझ्याकडे अतिप्रेमाने बघत होती..."इस प्यार से मेरी तरफ ना देखो....प्यार हो जायेगा.." मी लगेच गुणगूणले तर... अंगावरच काय ती यायची बाकी रहात म्हणाली.."क्यों दिया पैसा... तू देगी तो हमकोभी देना पडता है... ऐसे लोगोंको तूनेही सर पे चढाके रखा हैन...!" ई.ई..... आणि खाडकन दार बंद केलं माझ्या नाकावर..{चष्मा वाचला..!}
       नेहमीप्रमाणे तेव्हा काहीही न बोलता मी घरात आले.. ( मराठी माणूस आणि परप्रांतीय...! )  पोराला एक ’प्रेमळ’ फटका घालून "बोंबलू नकोस" म्हणाले.. पण डोक्यात विचार सुरूच होते... काय बिघडलं मी जर पैसे मागायला येणाऱ्या लोकांना कधी पैसे दिले तर... नेहमी देते असे नाही गरजू असेल तर देतेच.. मी देण्याचे काम केलंय.. तो खोटं बोलो अगर खरं..!
       तीच गोष्ट विक्रेत्यांची.. येतात विकायला काही-बाही.. मला त्यांच्या तोंडावर दार बंद करताच येत नाही... मी विकत तर काही घेणार नसतेच.. पण ते मी त्यांना त्यांचं ऐकून घेवून हसून सांगते.. तेही हसत "धन्यवाद ठिक आहे" म्हणून जातात...
       उगाच त्यांच्यावर ओरडून काय साध्य झालं असतं...?? माझाही मूड खराबच ना... त्यापेक्षा माणुसकी म्हणून हसावं.. वेळ नसेल तेव्हा फक्त तसं निदान नीट सांगावं...
       तेच आपल्याला फोन करून म्युचुअल फंड, पॉलिसी विकणाऱ्या मुला-मुलींना आपण नीट मला सध्या काहीही नकोय म्हणू शकतो ना... मान्य आहे ही लोकं फार त्रास देतात...पण आपण त्याजागी असतो तर.. एखादी गरीब पण चांगल्या घरातली मुलगी पोटापाण्यासाठी हे काम करत असेल आणि कदाचित दिवसातून सारख्या शिव्या ऐकून घरी जाऊन रडतही असेल पण तिच्याकडेही पर्याय नसेल ना...!
        बस्स... एवढंच समजून घ्या असं माझं म्हणणं आहे... सगळ्यांना माणूस म्हणून आदर द्या....! एवढं कराल का....???
                          

9 comments:

BinaryBandya™ said...

दारावर येणाऱ्यांच्या तोंडावर डायरेक्ट दार कसे काय आपटतात लोक देवच जाणे...

Abhi said...

@#$#@#$@$, घडा शिकवला पाहिजे असल्या लोकांना...

PIN@LL said...

hona loka evadhe dusht kase astat????

k. shripad said...

kiti chhan lihila aahe chait. chhotasa anubhav. rojachach. bahutek nistun janara. pan chhan tipla aahe.

Anonymous said...

>>>सगळ्यांना माणूस म्हणून आदर द्या....
खर आहे ग ....आपल्याला त्यांच्या जागी ठेवून दुसर्या बाजूचाही विचार करायला हवा...छोटी पण बराच काही सांगणारी पोस्ट ...

Sameer Shah said...

Gr8 n meaningful poets buddy..:) really appreciate ur talent..:) ur talent..:)

आशा जोगळेकर said...

खरंय ग मला पण जडच जातं कुणाच्या तोंडा वर दार बंद करणं । किंबहुना मी हात पुसायची फडकी, पोछे, मेणबत्या, फिनाइल वगैरे गोष्टी मी ह्या विक्रेत्या मुलीं कडूनच घेते बाजारातून नाही आणत. तेव्हढाच आपला हातभार. मुद्दा छान मांडलास

Pankaj said...

I didnt think in my life that u r such sensicitive great yar

GOMMI said...

nahi barobar aahe tumach pan jagat sagalya NAMUNYACHE lok rahatat... kunala patat kunala nahi.. aapan apal barbor asav