Translate

02 November 2009

हे ही नेहमीचंच ......

हे ही नेहमीचंच ......
"रागावलीस.....चिडलीस माझ्यावर...??"
तुझं विचारणं.....
"नाही रे....तुझ्यावर कशाला रागावेन..."
असं म्हणत माझं डोळ्यातलं पाणी टिपणं...
हळूच सोडलेला सुस्कारा नकळत मला कळतोच..
दुखावलेली असतानाही हासणं मला जमतंच...
तूझ्यावर रागावून कुठे जाणार...
प्रत्येक वळणावर तूच भेटणार..

पण अश्यावेळी...
तूझ्या प्रेमाच्या वर्षावात भीजताना....
आत कुठेतरी एक कोपरा कोरडाच रहातो...
नंतर माझ्याच अश्रूंनी भिजवण्यासाठी...

पण बघ....जप मला....
इतकाही पाहू नकोस अंत ....
मी होईपर्यंत....कोरडीठक्क...!!-----चैताली.

3 comments:

आशा जोगळेकर said...

इतकाही पाहू नकोस अंत ....
मी होईपर्यंत....कोरडीठक्क...!!
वा, आज खूप दिवसांत आले तुझ्या ब्लॉग वर अन मस्त रुसुरुसु खुसुखुसु कविता मिळाली वाचायला .

Innocent Warrior said...

shevatache kadave bhannat ani ashakya vatate, pan kordi thakk shabda avadala nahi.

Pinall said...

दुखावलेली असतानाही हासणं मला जमतंच...

khup chaan :) :)