Translate

26 April 2009

तुमच्याकडे असलेलं आकाश......!!!

जास्त काही बोलत नाही...
आकाशाशी असलेलं नातं मी चांदण्यात मोजत नाही...
जरा बिचकतंच गोळा करते..... विचारांचे कवडसे..
अन प्रकाशून स्वत:ला लगेच विझवते....
आकाशाचं काही वाटत नाहीच मला....
पंखांखाली लपवून फिरते मी ते....

तुमच्याकडेही असतील काही आकाशाचे तुकडे....
बसा जोडत आणि सांधत....
एखादा नाही सापडला तर या मग मागायला उसना...
देता येणार नाही मला...
सात आसमानं मिळून माझा एक पंख बनलाय...

सांभाळा...
तुमच्याकडे असलेलं आकाशही.....
एखादं पीस असेल....
माझ्याच पंखातून....
निसटलेलं.....!!----चैताली.

3 comments:

Innocent Warrior said...

:)

आशा जोगळेकर said...

वा, बघते असलं कुठे तुझं पीस तर. he word verification kadh ve far tras det.

Pinall said...

wow.... ths it