वाहून नेत असते मी....
भ्रमाचे भोपळे....अन् कित्येक गहाळ शून्य...
सोडवत असते...निर्णयगुंते....अनिर्मित...
अधाशासारखे पानं उलटते...सारं आकाश पालथं घालते....
संदर्भ शोधते तुझे....अतार्किक...
सैरभैर होवून विचारडोंगर पोखरते...
माझं स्वत:चं (?) अस्तित्व पणाला लावून...
जगरहाटीसाठी गहाण पडलेल्या तुला....
फुटक्या-तुटक्या,विखुरलेल्या कणांमधून साद घालते..
अस्थीहिन सापळ्यांतून.. कातडी वाचेल का...अशा..
अमोघ...अगम्य शंका (कातडीऐवजी??)पांघरून फिरते ....
कधी क्षुब्ध...कधी लुब्ध होवून करते अंत्यहीन नर्तन....
तर कधी बिनवाद्याचे...बिनतालाचे....आश्रित संकिर्तन.....
मी तुला अशी सुर्यांत.....चंद्रात...धुंडाळत असताना...
असे बिनमरणाचे....सरण जगत असताना....
देत जा इशारा..तुझ्या विहित अस्तित्वाचा......हे कस्तुरगंधी .....
अन् अशीच झरत राहूदे...माझ्यातून....
तुझीच अभिमंत्रित अभिव्यक्ती.......!!!
-----चैताली.
2 comments:
उत्क्रुष्ट कविता आहे आपल्या.
धन्य्वाद .....मनापासून.....!!!
Post a Comment