Translate

12 May 2014

.वर्ख.

उठावं रात्री-अपरात्री...
अन फिरावं जंगलात..

स्वप्नांच्या...
झोकांड्या खात...

नश्वर होऊन...
शरीर करावं दान..
जंगलांला ..पर्यायाने झाडांना...

चाफ्याची झाडं शोधून..
त्यांच्या ऊन-सावल्यांचा..
लेप लावावा शरीरावर...

ज्यामुळे..
वर्ख निघून जावा
जगण्याचा..

नितळ..स्वच्छ उरावं...
अन
पुरवं स्वत:लाच
एखाद्या झाडाखाली...
.

(फुलेल का एखादं फूल माझ्यावर तिथे...?)
        


       ....चैताली.

4 comments:

Akshay Vane said...

फार छान व्यक्त होता येतं तुम्हाला. मनाच्या आतलं अस्सल असं खूप कमी वाचायला मिळतं. तुमचा हा ब्लॉग पाहून नि वाचून मात्र तसली खंत वाटणार नाही.

चाफ्याच्या सावलीच्या लेपाची कल्पना फारच सुंदर!!!

लिहित राहा. व्यक्त होत राहा.
शुभेच्छा,

केदार said...

सावलीच्या लेपाची कल्पना फार छान.

Asha Joglekar said...

चाफ्याच्या सावली चा लेप ..........

Ganesh Mohan said...

फुलपाखरु फक्त 14 दिवस जगतं,परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगुन कित्येक ह्रदय जिकंतं,
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हुदय जिकंत रहा .य.......