इतकं पुढे येऊ
असं माहित असतं तर..
तर आधीचा बधीरपणा बरा होता..
कोणी शरीराच्या कातडीचा
डफ वाजवला तरी...
पापण्या नि:शंक स्वस्थ होत्या..
आर्त जगण्याच्या गोष्टी
कोणी सांगितल्या तरी..
तार्किक कानाडोळा करत येत होता..
अंतस्थ रस्ते आले तरी
बेतशीर ओल जाणवत होती..
आता तर वेड्यागत सगळं...
ती ओल बुबूळभर साठून..
कढत रक्त ओततेय हृदयात...
आता त्या ओलीनं..
पेटायची बाकी आहे फक्त...!!
....चैताली.