Translate

09 February 2013

चष्म्यावाला माणूस...

एक माणूस आलाय गावात....
डोळ्यांच्या जागी नुसता चष्मा असणारा.....

त्याचा चष्मा समोरच्या माणसानुसार बदलतो म्हणे...!
.
.
मग काय....
माणसं बिचकायला लागली त्याच्यासमोर यायला...
स्वत:लाच किती घाबरतात नं माणसं...???

मी ही गेले....
लिपस्टिक लावून... सेंट-बिंट मारून....
तर स्साला कोऱ्या चेहेऱ्याने म्हणाला....
"....चष्मा हरवलाय....!"
.
.
च्यायला.... शोधा स्वत:च स्वत:ला.....!!
आरसा आहे का हो कोणाकडे.....???

.....चैताली.

4 comments:

Asha Joglekar said...

Wa, asa chashma milel ka ho ?

BinaryBandya™ said...

sundar

Shriraj said...

Kharach Chhaan... kalpana hi ekdam veglich

सौ गीतांजली शेलार said...

मुक्त कविता आहेत तुमच्या , खरंच जणू परकरी पोर ! खूप छान ! मनात आले ते शब्दात येण्यासाठी तितकच मोकळं मनही हवं !