Translate

11 July 2011

पल्याड रहातो पाऊस...

ढगांच्या अल्याड..
माझं गाणं...
पल्याड रहातो पाऊस...

थेंबांच्या वाटेनं..
आल्हाद जाताना..
वळून नको पाहूस....

हळव्या पखांना...
पाणेरी किनखाप..
नाजुक-साजूक...!

रुजतो पाऊस...
डोळ्यांत माझ्या...
माझ्याशी हितगुज...!

थेंबांची नक्काशी...
बोलते माझ्याशी...
नको ओंजळीत घेऊस...!

ओली अधास...
वाहते मनात..
संपवी माझा पाऊस...
.
.
फक्त माझा पाऊस...!


          ---चैताली.

5 comments:

श्रिया (मोनिका रेगे) said...

खूप छान....एक घनवेडी कविता....

चैताली आहेर. said...

:) dhanyavd monika.....

BinaryBandya™ said...

सुंदर ...

ढगांच्या अल्याड..
माझं गाणं...
पल्याड रहातो पाऊस... :)

फारच सुंदर

D shivani said...

kyaa baat hai...jiyo

Jitendra Indave said...

खरोखर छान लिहिली आहेस कविता .