Translate

20 September 2010

........सवाल तत्त्वांचा!!!


खरं कोणाला पटत नाही....
आणि खोटं मी बोलत नाही...
तत्त्वातंच बसत नाही ते माझ्या...
तत्त्वं-बित्त्वं फार मानते मी,
मात्र कुबड्या नाहियेत त्या माझ्या,
म्हणुनच अजुनही दमदारपणे पाउल टाकतेय.....
उगाळते त्यांना अधुन-मधुन आणि फासते जगण्याला...
तत्त्वांच्या पॅरामीटरखाली मोजते लोकांना!

पण कधी-कधी वाटतं....प्रातिनिधिक शब्दांचे ...
बुडबुडे तर नाहीत ना..... माझी तत्त्वं?
दयावं का त्यांना एवढं महत्त्वं ...
स्वत:च लादलेलं असामान्यत्व??
जाउन बसतात मुळांशी आपल्या भेगांमधील मातीसारखी....
लिंपा नाहीतर खरवडून काढा !!
तत्त्वं असावीत पारदर्शक.. डोळ्यांतल्या लेन्ससारखी...
दिसुनही येत नाही घातलीये म्हणून.. आणि स्पष्टही दिसतं...
धुळीपासुन जपावं लागतं मात्रं..... अहंकाराच्या!
हं! आणि घालून "झोपताही येत नाही"......

तत्त्वं पाळणारंच मी...
पण दावणीला नाही बांधणार...
गुलामही नाही बनणार त्यांची....
राज्यंच करायला लागली माझ्यावर ती तर......

बासनात गुंडाळून ठेवीन........ नि:संशय!!!!!!!


------- चैताली.

3 comments:

PIN@LL said...

chan ahe kalpana..lenseschi....

आशा जोगळेकर said...

तत्वं म्हणजेच तर आपण. कधी कधी त्यांचा त्रास होतो पण बासनांत नाही हं गुंडाळायचं .
सुंदर झालीय कविता.
दर वेळी तत्वं लिहितांना तत्त्व असं झालंय तेव्हढं नीट करून घे .

Anonymous said...

very good, manala bhidnari kavita ahe.....