Translate

27 July 2010

माझ्याकडेही एक पाऊस आहे...

माझ्याकडेही एक पाऊस आहे...
आसावलेला....उसासलेला....
पापण्यांआड दडून...
डोळ्यातच भिजलेला...

माझ्याकडेही एक पाउस आहे...
उधाणलेला...उफाणलेला...
तिरक्या रेघांमध्ये गुंतून.....
वेडावाकडा भरकटलेला....

माझ्याकडेही एक पाऊस आहे...
ढगाळलेला....तहानलेला....
अगदी भरून येवून...
बरसूनही तहानलेला....


माझ्याकडेही एक पाऊस होता..
रिमझिमता...रुणझूणता....
हळूच डोळे मिचकावून...
"येऊ..?"विचारणारा....



बघ जरा...
अजूनही असेल तो..वेडा..
गच्च भिजून...
तुझ्या अंगणात लपलेला...!

               ----चैताली.

6 comments:

viju said...

Jyacha tyachya paus.............

Abhi said...

concept far avadali.
zakas, khodkar tarihi haluvar kavita aahe.

nice!!!

आशा जोगळेकर said...

प्रत्येकाचा पाऊस त्याला त्याला चिंब करतच असतो पण कधी कदी बरसून ही कोरडा ठण्ण ठेवतो. सुरेख कविता.

Tushar Joshi said...

चला तूही पाऊसमय आहेसच तर.
हा घे खो.

http://tusharnagpur.blogspot.com/2010/08/blog-post_31.html

Asha Joglekar said...

Chaitali mee hi ya paoos sakli kawitet aahe mazahee kho tulach. mazya blog war jaoon tula aata paryant chi kadwi baghta yeteel. hya computer war marathi (Dewnwgari) fonts down loaded nahi mhanoon roaman.

अमित दत्तात्रय गुहागरकर said...

तुझ्याकडला पाऊस आवडला..!