Translate

21 June 2010

खरं तर मीही....

खरं तर मीही....
कविता लिहायला हव्यात...
ह्या वेड्या पावसावर......


झिपऱ्या केसांना सावरत...
नाचऱ्या थेंबांवर खूष होऊन....
भिजायला हवं....आभाळभर...!!


हसायला हवं.....भिजऱ्या डोळ्यांनी...
आभाळाचं गाणं ....
गच्च पांघरून....अंगभर....!!


पण....
असं काहीच नाही होत ......
रस्ताभर पाऊस येवूनही...
मा्झ्या पसाभर आंगणात....
उन्हाची ओरड ....


अन्‌...
तन गच्च भिजलंय़...
तरीही....
मनाला युगोन्‌यूगे....
पडलेली तीच ती....
अधाशी कोरड...!!


----चैताली.

4 comments:

धुंद रवी said...

तुझा ब्लॉग वाचला... खूप खूप सुंदर....
तुझ्या प्रत्येक कवितेविषयी खूप काही बोलण्यासारखं आहे. बोलू कधीतरी... लिहित रहा....

धुंद रवी
http://dhundravi.multiply.com/

BinaryBandya™ said...

झिपऱ्या केसांना सावरत...
नाचऱ्या थेंबांवर खूष होऊन....
भिजायला हवं....आभाळभर...!!
mastch ...

रस्ताभर पाऊस येवूनही...
मा्झ्या पसाभर आंगणात....
उन्हाची ओरड ....


सगळी कविताच छान आहे ...
फार आवडली

shashankk said...

va sunder kavita!!!
ashaach sunder sunder kavitansathi pahaa -www.paarijaat1.blogspot.com
shashank

Asha Joglekar said...

हसायला हवं.....भिजऱ्या डोळ्यांनी...
आभाळाचं गाणं ....
गच्च पांघरून....अंगभर....!!
किती सुंदर, अग मग भीज ना असं आभाळाच गाणं गच्च पांघरून .
सुंदरच