Translate

06 May 2010

स्वप्नाळले.....!!

गुंतले तुझ्यात....
तुझ्यात भुलले...
मिळवण्या तुला...
वेडावले.....!!


मदीर श्वासात...
श्वासात भिनले..
समेटता तुला...
सुखावले.....!!


जपले मनात...
मनात गुंजले...
गुपित आपुले...
उसासले.....!!


घे ना जवळी ...
जवळी राहुदे.. ...
आठवात तुझ्या
स्वप्नाळले.....!!



----चैताली.

1 comment:

Harshada Vinaya said...

मला आवडली कविता.. दुसरे कडवं विशेषतः...