खांद्यावरचं ओझं तसं नेहमीचंच...
सुरवातीला कोण अप्रूप त्याचं..
मग कुतूहल...
आणि आता सवय..
सारं सारं गच्च दाबून बसवते त्यात..
वाटतं एकदाचं overflow होईल ते..
फसफसून रिकामं होईल..
म्हणून चेहऱ्यावर...
लकेरसुद्धा उमटू देत नाही त्याची...
brainless हृदयाचं मेंदूपर्यंत काहीही पोहोचू
देत नाही..(सहसा!)
मग खूप चालते..खूप चालते...
येतंच लक्षात...
त्या ओझ्याला जगणं असंही म्हणतात..
चालो बे... चालो बे ..!
----चैताली.