Translate

26 June 2012

बोलण्यापरी....

बोलण्यापरी....

दिशांचे कल्लोळ...
अंगी लेऊन...
रात्र-रात्र विस्कटते...

अस्वस्थतेची लय...
अंगी भिनवून...
ऐल-पैल कसमसते...

जन्मजपल्या संवेदना...
खोल रुजवून...
शब्द-शब्द विरते...

जगण्याच्या गर्ता....
पापण्यांत माळून..
झंबळ-झंबळ झिंगते...

बोलण्यापरी...
.
.
डोळे मिटून...
आभाळाची फूलपाखरं...

रंध्र-रंध्र..
मी झेलते ..!


      ....चैताली.

5 comments:

sanket said...

सुंदर कविता.. शब्दांच्या अचूक निवडीवरून भाषेवर असलेली पकड लक्षात येते.

जगण्याच्या गर्ता....
पापण्यांत माळून..
झंबळ-झंबळ झिंगते...

...

चैताली आहेर. said...

abhar Sanket... :)

BinaryBandya™ said...

सुंदर

Harshada Vinaya said...

चैताली ताई, खो.. लगेच उठून पळायला लागू नकोस.. ;)
हे बघ: http://karadyaachhata.blogspot.in/2012/07/blog-post.html

http://samvedg.blogspot.in/2012/06/blog-post.html

Innocent Warrior said...

:)