Translate

22 March 2010

राहूदे तुझ्याकडे.....!

आहे तरी काय माझ्या कवितेत...
काही काटेरी धुमारे...
काही चटके... विझते निखारे...
राखभर विस्तव....
अन निखालस कटू वास्तव...

पसाभर चांदण्या....
हिरमुसला चंद्र....
एखाद्या ढगाची उसनी सावली..
जी उगाचच...
सैरभैर आभाळभर धावली....

तरीही काही कविता....
राहूदे तुझ्याकडे.....
काही मनाशी ठेव जपून...
अन काही अंगणात ठेव पुरून.....!

जास्त काही लागणारच नाही...
एखाद्यादिवशी मनात झुरशील...
असतील-नसतील तेवढे उमाळे लपवशील...
दिसलंच तर जप डोळाभर..
माझं ओलं मन...

पाकळीही उमलणार नाही...
वाढेल कदाचित तुझ्या अंगणात....
फक्त ..फक्त खुरटं तण.....!!




---चैताली.

9 comments:

बाबासाहेब जगताप said...

आहे तरी काय.../ उगाचच...
असं सगळं काही निरर्थक म्हणता म्हणता मनातला जीवघेणा ओलावा जो काही केल्या कोरडावत नाही तो सगळं काही तोडून टाकण्याला विरोध करतोच. मग आगतिकपणाने शेवटी यावं लागतं
तरीही....
अशा शरणागतीपर्यंत.
असतील, नसतील आणि दिसलंच तर.. या सगळ्यात आपली जिवघेणा जिवंतपणा जोपासणारी मुळं असतीलच.. आणि दिसतीलंच... अशी आशा बाळगुन असतात.आणि शेवटी कितीही गमजा मारल्या सारं काही मिटून टाकण्याच्या तरी सुद्धा आपल्याला हवी असतेचं त्याच्या/तिच्या आयुष्यात थोडीशी जागा.. किमान नाही फुलपाकळी म्हणून किमान तण म्हणून तरी...

उगाचच अशी सुरु होणारी कविता मनातल्या खोल गर्भात कायम ठाण मांडून बसलेल्या ओल्या क्षणांची आठवण आणि त्या आठवणीच्या चिरंतपणाचा ध्यास व्यक्त करते.

सहजपणाने आलेली अकृत्रिम कविता... आवडली.

चैताली आहेर. said...

आभार... :)

Unknown said...

अशीच पुरून ठेवलेली बीज अंकूरतात , वाढतात आणि आपल्याही नकळत आधारवड बनतात

जखडली जातात काही आयुष्य दुस-यांसाठी कदाचित यालाच प्राक्तन म्हणतात.


कविता छानच

Asha Joglekar said...

काय हे बाई काय चाललंय . उगवतंय ना उगवण्याची जिद्द आहे ना मग झालं तर . कविता उत्सफूर्त खरी पण इतकी निराशा नको .

Suman said...

khupch sunder kavita aahe.

Harshada Vinaya said...

काही बोलताच येत नाहीये.. एकदम "चैताली ताई" आहे कविता!!

Raj Jadhav said...

आहे तरी काय माझ्या कवितेत...
काही काटेरी धुमारे...

its beyond words

BinaryBandya™ said...

faar chaan

Anonymous said...

you are simply great yaar !!!

राहूदे तुझ्याकडे.....या कवितेसाठी तुला माझा "सलाम"

जहीर