Translate

27 June 2011

हा पाऊसही तुझ्यासारखाच....

हा पाऊसही तुझ्यासारखाच....
अनोळखी....!
उन्हाच्या मागे बेताल ढगांसह....
धावून जाणारा...
छत्रीच्या कडाकडांवरून थबकून....
वाऱ्याला गुंगारा देवून.....
रस्त्यांना सुन्न करणारा...

हा पाऊसही तुझ्यासारखाच...
बेभरवश्याचा...!
येशील...येशील म्हणताना....
दूर गावी कोसळणारा....
एकटी असताना मात्र...
भर दुपारी गाठून....
अंगोपांगी झिरपणारा....

मीही पावसासारखीच....
वेडी-बावळी....!
काजळ-काळ्या डोळ्यांमध्ये...
पाऊस घेवून फिरणारी...
उन्हाची तिरीप पकडून...
माझ्यातच रमून हसणारी...!


           ----चैताली.