मी बसून राहते तशीच...
हात-पाय नसलेल्या माणसासारखी...
धावून येणाऱ्या विचारांना...
"हाड" ही न करता येण्याइतपत असहाय...
मग चरफडते स्वप्नांवर..
ज्यात मला पुर्ण डोळे उघडून..
बघताच येत नसतं काही...
सारं बंद-चालू...उघड-मीट..
अश्या वाह्यात स्वप्नांना सोडून येते मी...
पुर्ण न झालेल्या पुलांवर...
पुर्ण न झालेल्या पुलांना कुठेच जाता येत नाही...
बसतात मग तिथेच झूलत...
अपूर्ण स्वप्नांचे जत्थे सांभाळत...
तेव्हा एक सुस्कारा सोडून...
नाठाळ विचारांना शोधून-हुडकून..
श्वासातून...डोळ्यांतून बेदखल करते...
आणि अश्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल...
हात-पाय फुटल्यागत...
एकदम चालायलाच लागते...!
...चैताली.
हात-पाय नसलेल्या माणसासारखी...
धावून येणाऱ्या विचारांना...
"हाड" ही न करता येण्याइतपत असहाय...
मग चरफडते स्वप्नांवर..
ज्यात मला पुर्ण डोळे उघडून..
बघताच येत नसतं काही...
सारं बंद-चालू...उघड-मीट..
अश्या वाह्यात स्वप्नांना सोडून येते मी...
पुर्ण न झालेल्या पुलांवर...
पुर्ण न झालेल्या पुलांना कुठेच जाता येत नाही...
बसतात मग तिथेच झूलत...
अपूर्ण स्वप्नांचे जत्थे सांभाळत...
तेव्हा एक सुस्कारा सोडून...
नाठाळ विचारांना शोधून-हुडकून..
श्वासातून...डोळ्यांतून बेदखल करते...
आणि अश्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल...
हात-पाय फुटल्यागत...
एकदम चालायलाच लागते...!
...चैताली.