पावसाच्या वळणा-वळणानं जाताना...
आकाशाचे पंख लेऊन उडणारी..
पाखरं कुजबुजलीच होती....
दुसऱ्या जगांबद्दल...!
म्हणून अथांग आभाळाकडे...
मागितलं काही तर...
ढगांचे ओलेते संभार...
ठेवले अधाशी पापण्यांवर...
गात्रागात्रानं...
दिगंत व्हावं म्हणून...
डोंगरमाथ्यांना....
दिशांच्या शपथा घातल्या...
तर वेल्हाळ सूर्यच...
टाकले झिरमिर पदरात...
आता काही गोष्टींची...
सांगता व्हायच्या आत....
आभाळाकडे...
एकटक बघावं म्हणतेय....
.
.
अगदी ..डोळे संपेपर्यंत....!!
..... ...चैताली.